महाराष्ट्र

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली

मुंबई: अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहें . जखमींना मदत दिली जात आहे ती महत्वाची आहे. त्याचसोबत पुणे व इतर गंतव्यस्थानांकडे प्रवास करणाऱ्या अडकलेल्या प्रवाशांसाठी तातडीने पर्यायी विशेष विमानसेवा वा ईतर प्रवाससेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, माहिती वाहिन्यांद्वारे असे स्पष्ट झाले आहे की अहमदाबाद येथून होणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांकडे जाण्याचे नियोजन असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

या प्रवाशांमध्ये काहीजण आपत्कालीन वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यवसायिक कारणांसाठी प्रवास करत होते, याचे भान ठेवून वडोदरा, सुरत अथवा जवळच्या इतर विमानतळांवरून विशेष उड्डाणांची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, वाहतूक व्यवस्था सुकर होईल आणि प्रशासनावरचा ताण कमी होईल, असेही त्या आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

2 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

2 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

2 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

2 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

2 तास ago

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय…

2 तास ago