महाराष्ट्र

मॉलमधील वाईन विक्रीबाबत शंभूराजे देसाईंच्या वक्तव्यानंतर तृप्ती देसाई आक्रमक…

औरंगाबाद: मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईन विक्री सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच सरकार जर महसूल वाढवण्यासाठी तरुणांना व्यसनाधीनतेकडे नेणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

तृप्ती देसाई म्हणाल्या, जेव्हा महाविकास आघाडीने मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला तेव्हा भाजपने आणि आमच्या सारख्या काही संघटनांनी याला विरोध करत सरकारला हा निर्णय मागे घ्यायला लावला होता. पण आता पुन्हा शिंदे गट आणि भाजपचे सरकार आलं असताना वाईन विक्री बाबत प्रतिक्रिया यायला लागल्यात. यामध्ये शेतकऱ्यांचे कसले हित आहे? असा सवाल करत तुम्ही उत्पादन शुल्क मंत्री म्हणून महसूल कमवण्याकडे बघताय असा थेट आरोप त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केला.

वाईन मुळे अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते तसेच ते व्यसनाधीन होऊ शकतात. मॉल मध्ये वाईन विक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाहीच. सर्वसामान्य नागरिकांनीही याला विरोधच केला आहे. शेतकऱ्याला पीक पिकवण्यासाठी पाणी लागत, वाईन नाही लागत, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असं सांगून स्वतःला महसूल मिळावा यासाठी तरुणांना व्यसनाधीनतेकडे जर कोणतं सरकार घेऊन जाणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

12 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago