महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी विद्यापीठांनी तत्परतेने कार्यवाही करावी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासाला पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करावे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणी, सूचना, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

विद्यापीठांनी दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्यावर तातडीने आणि ठोस कार्यवाही करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुविधांबाबत विशेष संवेदनशीलता दाखवून आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पाटील यांनी दिले.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी कुलगुरूंनी नियमित संवाद साधावा. विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न आणि सूचनांची माहिती घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. या संवादातून समोर आलेल्या प्रश्नांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उप सचिव अशोक मांडे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू ऑनलाइन उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लॉजिंगवर छापा टाकत २० ग्रॅम मेफेड्रॉनसह दोघे जेरबंद

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील लॉजिंगमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने मेफेड्रॉन (एम.डी.) बाळगणाऱ्या दोघांना…

1 तास ago

वेश्यालयात ग्राहक म्हणून गेल्यानेच आरोपी ठरवता येणार नाही; इलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

गाझियाबाद : वेश्यालयात ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीवर केवळ पैसे देऊन लैंगिक सेवा घेतल्याच्या आधारावर अनैतिक…

3 तास ago

चित्रनिर्मितीत AIचा वापर; २५ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा

मुंबई : चित्रपट निर्मिती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेऊन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी…

3 तास ago

टेंशनमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते का

आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना ताणतणावाचा सामना करावा लागतो. ताणतणावामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.…

3 तास ago

मधुमेहींनो, काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का

काजू हा चव आणि पौष्टिकतेसाठी ओळखला जातो. यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटिन असल्याने याचे…

3 तास ago

खोबरेल तेलात मिसळा ‘हा’ पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील वाढती उष्णता आणि गरमी यामुळे त्वचेचे अनेक प्रकारे…

4 तास ago