आरोग्य

खोबरेल तेलात मिसळा ‘हा’ पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील वाढती उष्णता आणि गरमी यामुळे त्वचेचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून सनस्क्रीन लोशन किंवा क्रिम्स लावतो. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन फार मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्वचेला सनस्क्रीन लावल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होत नाही. जर आपण सनस्क्रीन न लावता कडक उन्हात बाहेर पडलो तर त्वचा जळू शकते, सनबर्न होते किंवा टॅनिंग देखील होऊ शकते. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णता यामुळे त्वचेचा नैसर्गिक रंग बदलून त्वचा काळवंडली जाते, इतकेच नव्हे तर त्वचेचा नैसर्गिक पोत देखील बदलला जातो. यासाठीच, उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी त्वचेला सनस्क्रीन लावणे गरजेचे असते

या दिवसांत आपण वेगवेगळ्या प्रकारचे महागडे सनस्क्रीन लोशन आणि क्रीम्स विकत घेतो. परंतु या महागड्या सनस्क्रीनमध्ये केमिकल्सयुक्त पदार्थ आणि हानिकारक रसायनांचा वापर केलेला असतो. यामुळे त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. यासाठी आपण घरच्याघरीच खोबरेल तेल आणि इतर काही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने नॅचरल सनस्क्रीन अगदी मिनिटभरात तयार करु शकतो. घरच्याघरीच सनस्क्रीन तयार करण्यासाठी खोबरेल तेलात नेमका कोणता पदार्थ मिक्स करावा ते पाहा.

घरच्याघरीच सनस्क्रीन कसे तयार करावे

घरच्याघरीच सनस्क्रीन तयार करण्यासाठी तुम्हाला खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. सनस्क्रीन तयार करण्यासाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल काढून घ्यावे. मग यात खोबरेल तेल मिक्स करावे. एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल दोन्ही सम प्रमाणांत घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण एकत्रित चमच्याने फेटून घ्यावे. या मिश्रणाला जोपर्यंत एकदम क्रीम सारखे टेक्श्चर येत नाही तोपर्यंत चमच्याने हलवून फेटून घ्यावे. त्यानंतर, तयार सनस्क्रीन एका हवाबंद बाटलीत भरून स्टोअर करून ठेवावे. आपल्या गरजेनुसार आपण हे घरगुती सनस्क्रीन त्वचेला लावू शकता.

त्वचेवर सनस्क्रीन लावताना कोणती काळजी घ्यावी 

१) त्वचेवर सनस्क्रीन लावताना त्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. गरजेपेक्षा कमी प्रमाणात सनस्क्रीन लावल्याने त्याचा त्वचेवर काहीच परिणाम होत नाही. याउलट जास्त सनस्क्रीन लावल्यास त्वचा खराब देखील होऊ शकते.

२) सनस्क्रीन फक्त उन्हांत जातानाच लावले पाहिजे असे नाही. आपण घरात असताना देखील नियमितपणे त्वचेला सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरु शकते.

३) सकाळी फक्त एकदाच त्वचेला सनस्क्रीन लावणे पुरेसे नाही, तर वारंवार सनस्क्रीन लावत राहणे आवश्यक असते. विशेषतः उन्हात बाहेर जाण्यापूर्वी २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे.

४) मेकअप करत असाल तरी त्वचेला सनस्क्रीन लावणे गरजेचे असते. चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावावे. यानंतर पुन्हा मेकअप करावा.

५) बाहेर जास्त सूर्यप्रकाश नसला तरी त्वचेला सनस्क्रीन लावणे आवश्यक असते. त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आणि त्वचेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी सनस्क्रीन लावता गरजेचे असते.

६) फक्त चेहऱ्यावरच सनस्क्रीन लावू नका, तर हात आणि पायांना देखील सनस्क्रीन लावणे तितकेच आवश्यक असते. उन्हांत जाण्यापूर्वी चेहऱ्यासोबतच हातापायांना देखील सनस्क्रीन लावणे गरजेचे असते.

७) उन्हात जातांना शक्यतो, संपूर्ण अंग झाकेल असे किंवा पूर्ण बाह्या असतील असे कपडे घालावेत जेणेकरून तुमची त्वचा कमीत कमी सूर्यप्रकाशात येईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

8 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

12 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

12 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

12 तास ago