शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील लॉजिंगमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने मेफेड्रॉन (एम.डी.) बाळगणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने रंगेहात पकडले. बुधवार (दि १९) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मार्वल कम्फर्ट (सुरज) लॉजिंगमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत २० ग्रॅम मेफेड्रॉनसह तब्बल ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरूर शहरात अंमली पदार्थांविरोधातील हि अलीकडील दुसरी धडक कारवाई ठरली आहे.
या प्रकरणी दादा धावडे (वय २७, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि अमोल राजाराम पोटावळे (वय ३५, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर गावच्या हद्दीतील मार्वल कम्फर्ट (सुरज) लॉजिंगमधील रुम क्रमांक २०९ येथे दोघांकडे अंमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी लॉजिंगवर छापा टाकला. झडतीदरम्यान संशयितांच्या ताब्यात २० ग्रॅम वजनाची मेफेड्रॉन (एम.डी.) पावडर आढळून आली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगण्यात आला होता. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शिरुर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीचे २० ग्रॅम मेफेड्रॉन, अमोल पोटावळे याच्याकडील १९ रिकाम्या प्लास्टिकच्या पिशव्या, अंदाजे ५ हजार रुपये किमतीचे सॅमसंग ए-३४ ५जी व व्हिवो एक्स-२०० एफई हे दोन मोबाईल फोन तसेच ५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ कार (एमएच-१६ बीएम-९१००) असा एकूण ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे शिरुर शहरात अंमली पदार्थांच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरु केलेल्या मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे. मात्र, लॉजिंगसारख्या ठिकाणी एम.डी.सारखा गंभीर अंमली पदार्थ पोहोचतोच कसा, हा प्रश्नही या कारवाईनंतर ऐरणीवर आला आहे.
जप्त करण्यात आलेला मेफेड्रॉन नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा पुरवठादार कोण, तो पुढे कोणाला विकला जाणार होता आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे अटक केलेल्या दोघांच्या चौकशीतून अंमली पदार्थांच्या साखळीतील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
शिरुर शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लॉजिंग, हॉटेल व इतर संशयास्पद ठिकाणांवर नियमित तपासणी आणि कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरुर पोलिस करीत आहेत.
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…