महाराष्ट्र

बिबवेवाडीतील जिल्हा परिषदेच्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करा

मुंबई: पुणे जिल्हा परिषदेची निवासस्थाने उभारण्यासाठी बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरील आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ३७(१) अंतर्गत प्रक्रिया करून पुणे महानगरपालिकेने आरक्षण रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने नगरविकास विभागाकडे सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या भूखंडांवरील आरक्षण रद्द करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या निवासस्थानांसाठी उपलब्ध जागेचा वापर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीला पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि नगरविकास विभागाच्या सहसचिव सुलेखा वैजापूरकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.पुणे जिल्हा परिषदेच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

13 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

13 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

13 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

13 तास ago