महाराष्ट्र

बारामती तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान! प्रशासन सज्ज

बारामती: बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गटासाठी मतदान ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर मतमोजणी जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे ९ फेब्रुवारीला होईल.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम २०२६ अंतर्गत, तालुका निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी निवडणूक तयारीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद ३१ आणि पंचायत समिती १२ गटांसाठी एकूण ४३ उमेदवार रिंगणात आहेत.

उमेदवारांचे वितरण असे आहे

जिल्हा परिषद गट: सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६, नीरावागज ५

पंचायत समिती गट: सुपा २, काऱ्हाटी २, शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबूत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २

तालुक्यातील मतदार संख्या २ लाख ६४ हजार ६४२ असून त्यामध्ये पुरुष मतदार १,३५,०७३, महिला १,२९,५६० आणि इतर ९ आहेत. मतदानासाठी एकूण २९९ केंद्र तयार करण्यात आले असून, पिंपळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महिला मतदान केंद्र आणि कटफळ येथील प्राथमिक शाळा आदर्श मतदान केंद्र म्हणून काम करेल.निवडणूक प्रक्रियेसाठी १,९४५ अधिकारी, कर्मचारी व शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छतागृह, पाळणा, व्हीलचेअर, रॅम्प, वैद्यकीय सुविधा, पोलीस सुरक्षा, अग्निशमन सुविधा आणि वाहनतळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती मोहिमाही राबविली जात आहे. टपाल मतपत्रिकेद्वारे ७४३ अर्ज प्राप्त झाले असून, आतापर्यंत ३१३ मतदारांनी मतदान केले आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी सर्व पात्र मतदारांना मतदानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. विजयी उमेदवारांची नावे १० फेब्रुवारी रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जातील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago