मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरातील स्पर्धक दिव्या शिंदेला बिग बॉसनं तातडीने घराबाहेर काढलं आहे. कारण, तिने नॅशनल टेलिव्हिजनवर इतर स्पर्धकाला जीवावर मारण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसला सुरक्षेच्या कारणास्तव ही कठोर कारवाई करावी लागली.
घटनेनुसार, बिग बॉसमध्ये पार पडलेल्या एका टास्कदरम्यान घराबाहेरील स्पर्धकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे फुल टाकण्याचे आव्हान देण्यात आले होते. जेव्हा त्या टास्कमध्ये तन्वीची वेळ आली, तेव्हा तिने दिव्याचं नाव घेतलं. हे ऐकून दिव्याला राग आला आणि तिने घरातील इतर सदस्यांना जीव मारण्याची धमकी दिली. बिग बॉसने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दिव्या आपल्या मतावर ठाम राहिली.
नंतर तिला कन्फेशन रुममध्ये बोलावून तिची चूक सुधारण्याची संधी दिली गेली, पण दिव्या तिथे देखील ताठर होती. राकेशने तिला सौम्य भाषेचा वापर करण्याचा सल्ला दिला, परंतु राग अनावर असलेल्या दिव्याला काही फरक पडला नाही. शेवटी सर्व सदस्य हॉलमध्ये असताना, बिग बॉसने तिच्या चुकीचा उल्लेख केला आणि दंड म्हणून तिला घराबाहेर काढले.
दिव्याच्या बाहेर पडण्याने घरातील सर्व सदस्यांना धक्का बसला. विशेषतः दीपाली सय्यदच्या डोळ्यातून अश्रू ओघावले, मात्र दिव्याने न रडता सर्वांचा निरोप घेतला.ही घटना बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये पहिल्यांदाच घडली आहे. याआधी पाचव्या सीझनमध्येही आर्या आणि निक्की यांच्यातील वादामुळे आर्याला घराबाहेर काढलं गेले होते, पण दिव्याच्या बाहेर पडण्याचा प्रकार आणखी धक्कादायक ठरला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…