Categories: क्राईम

मुकबधिर मुलीवर तिच्याच वडिलांकडून अत्याचार; 5 महिने गर्भवती

मुंबई: शहरातील कफ परेड भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय मूकबधिर तरुणीवर तिच्या स्वतःच्या वडिलांकडून लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पीडित मुलीने तिच्या आजीकडे पोट दुखत असल्याची तक्रार नोंदवली. तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीत तिच्या गर्भात तब्बल पाच महिन्यांचा गर्भ असल्याचे उघड झाले.

रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. फॉरेन्सिक तपासणीनंतर २७ जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या अहवालात मुलीच्या गर्भातील डीएनए तिच्या वडिलांच्या डीएनएशी जुळत असल्याचे सिद्ध झाले. यानंतर ३ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, अत्याचाराची घटना मार्च ते सप्टेंबर २०२५ दरम्यान घडली होती. २२ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला, मात्र वडिलांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. मुलगी मूकबधिर असल्यामुळे पोलिसांना तिचा जबाब नोंदवण्यात अडचणी येत होत्या.

तपासादरम्यान, पीडित मुलीला अनेक व्यक्तींचे फोटो दाखवले गेले. यापैकी एका १६ वर्षीय मुलाला आणि ३२ वर्षीय पुरुषाला अटक करण्यात आली. एकूण १७ व्यक्तींचे डीएनए आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले, ज्यात पीडित मुलीचे वडील, कुटुंबातील सदस्य आणि शेजारी यांचा समावेश होता.डीएनए अहवालानंतर स्पष्ट झाले की, या घटनेत मुलीच्या वडिलांचा सहभाग आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

2 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago