महाराष्ट्र

जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धे’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाची दखल घेत रील्स स्पर्धेसाठी रील्स अपलोड करण्याची अंतिम मुदत आता ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये मृद व जलसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी तसेच या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी रील्स अपलोड करण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

क्षेत्रीय स्तरावर स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि रील्स तयार करून अपलोड करण्यासाठी कमी कालावधी लक्षात घेता मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ या संदेशातून नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे आणि आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून मृद व जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.

दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी राज्यभर होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाच्या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

13 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

13 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

13 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

13 तास ago