महाराष्ट्र

तिजोरीची चावी आमच्याकडेच, चाव्या नसल्या तरीही मालक आम्हीच सत्ताधाऱ्यांची ही वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी आहे

निवडणुकीच्या प्रचारात निधीची भाषा म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही

नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी मंत्र्यांच्या बेताल विधानाचा समाचार घेतला. मत दिली नाही तर निधी देणार नाही, महाराष्ट्राची तिजोरी ही सत्ताधाऱ्यांची खासगी संपत्ती आहे का? यांच्या बापजादयानी कमावलेली तिजोरी आहे का? सत्ताधारी जनतेला धमकावत आहे, गुंडगिरीचा भाषा वापरत असताना निवडणुका आयोगाला दिसत नाही का? अशा वक्तव्याची दखल निवडणूक आयोग घेऊन कारवाई का करत नाही असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ऐन निवडणुकीत निधीची भाषा करणे म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे. सत्ताधारी मतदारांना गृहित धरत आहे निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई केली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

एकीकडे राज्यातील शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसला आहे दुसरीकडे सरकारने कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटी मंजूर केले आहे. शेतकऱ्यांसाठी पैसे देण्याची वेळ आली की पैसे नसतात पण कुंभमेळ्यासाठी इतका खर्च केला जातो? यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते! कुंभमेळ्यासाठी झाड तोडली जाणार आहे,कुंभमेळा महत्वाचा की बळीराजा? शेतकऱ्यांनी या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवली पाहिजे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago