महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी प्रस्तावित जागा खासगी विकासकाकडून परत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

पुणे महानगरपालिकेने विकासकास बांधकाम परवानगी नाकारणे हे स्मारकाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यात असलेली महत्त्वपूर्ण जागा पुन्हा शासनाच्या ताब्यात आणून ती पूर्णतः सार्वजनिक हितासाठी वापरण्याच्या दिशेने ठोस आणि निर्णायक प्रक्रिया सुरू झाली आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारातून झालेल्या आढावा बैठकीनंतर संबंधित विभागांनी कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर आवश्यक कारवाई सुरू केल्याने या जागेवरील खासगी व्यावसायिक विकासाला स्पष्टपणे लगाम घालण्यात आला आहे.

ही जागा पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. त्यानंतर ती एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आली आणि पुढे खासगी विकासक मे. एन. जी. व्हेंचर्स यांना ६० वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया शासनाने स्थगित केल्यानंतर संबंधित विकासकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. “सदर जमीन ही सार्वजनिक हिताची असून प्रथम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच तिचा अंतिम उपयोग ठरवावा,” असे स्पष्ट निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा बैठकीत दिले होते.

या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसी तसेच पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवार पेठ, पुणे येथील नगर भूमापन क्र. ४०५ मधील सुमारे ८९०० चौ. मीटर जमीन भाडेतत्त्वावर दिली असली तरी संबंधित विकासकाने ही जागा एमएसआरडीसीकडे परत दिली आहे. तसेच प्रत्यक्ष जागेवर सुरू असलेल्या सर्व कामांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

यानंतर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाने खासगी विकासकाचा व्यावसायिक व वाणिज्य इमारतीचा प्रस्ताव अधिकृतरित्या फेटाळला आहे. मे. एन. जी. व्हेंचर्सतर्फे दाखल करण्यात आलेला व्यापारी/वाणिज्य इमारतीचा संपूर्ण प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे या जागेवर कोणताही खासगी व्यावसायिक वापर होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या जागेच्या सार्वजनिक उपयोगाबाबत शासनासमोर दोन महत्त्वाचे प्रस्ताव आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून ‘आंबेडकर भवन’च्या विस्तारीकरणाची, तर ससून सर्वोपचार रुग्णालयाकडून कर्करोग रुग्णालय उभारणीची मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही प्रस्तावांचा सामाजिक दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करून, नागरिकांकडून सूचना व हरकती मागवून पारदर्शक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

एमएसआरडीसीची ही जागा शासनाच्या ताब्यात आणून तिचा वापर पूर्णतः जनहितासाठी व्हावा, या दिशेने सुरू झालेली ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

45 मिनिटे ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

18 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

22 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

22 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

22 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

22 तास ago