महाराष्ट्र

राज्यात तंबाखू विक्रेता परवाना धोरण कधी

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय परिषद मुंबईत संपन्न

मुंबई: तंबाखू-सिगारेट अवैद्य विक्रीच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी एफसीटीसी कलम ५.३ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन व्हावे तसेच प्रस्तावित तंबाखू विक्रेता परवाना धोरण राज्य शासनाने लवकर अंमलात आणावे, अशी आग्रहाची मागणी राज्यभरातील तंबाखू विरोधी संस्था संघटनांकडून केली जात आहे.त्यासंदर्भातील राज्यस्तरीय परिषद मंगळवारी मुंबईत संपन्न झाली.

महाराष्ट्रातील तंबाखू उद्योगाच्या धोरणात्मक

अंमलबजावणीत बाह्य घटकांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या अंतर्गत मंगळवारी ( दि. १८) रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) राजतीलक रोशन यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. विटाळ स्टृटॅजीचे संचालक डाॅ.राणा जे.सिंग यांनी १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुच्या व्यसनापासून कसे दूर ठेवता येईल? तसेच अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यावर भाष्य केले. डाॅ.अर्जुन सिंग यांनी कमी वयात व्यसनास बळी पडल्यामुळे निर्माण होणारा कॅन्सरचा धोका विषद केला. तसेच मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी राज्यात कोटपा कायद्याची उपस्थिताना सविस्तर माहिती दिली.

तंबाखू विक्रेता परवाना धोरण कधी?

शाळा कॉलेज परिसर तसेच नागरी वस्तीत अवैद्य तंबाखू विक्रीच्या दुकानांना आळा घालण्यासाठी धोरण हवे. किरकोळ तंबाखू विक्रेत्यांची संख्या आणि तंबाखू उत्पादनाचे प्रकार मर्यादित करण्यासाठी तंबाखू विक्रेता परवाना आवश्यक आहे. या कार्यशाळेत आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग, महानगरपालिका, महसूल विभागाचे तसेच जिल्ह्यातील अधिकारी यांनी सहमती दर्शवली असून राज्य शासनाने लवकरात लवकर हे धोरण अमलात आणावे अशी विनंती केली आहे.

या कार्यशाळेत आरोग्य सेवा संचालकांचे संचालक डाॅ.नितीन अंबाडेकर, हेलीसचे संचालक डाॅ.प्रकाश गुप्ता, तांत्रिक सल्लागार डाॅ.शिवम कपुर, उपसंचालक डाॅ. उमेश शिरोडकर, टाटा मेमोरियल सेंटरचे प्रोजेक्ट अधिकारी डाॅ.राहुल सोनवणे, एनटीसीपी कार्यक्रम अधिकारी किशोर गांगुर्डे, मनसुख झांबड अध्यक्ष, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले, .निकीता गायकवाड यांनी सूत्र संचालन व अन्नपूर्णा ढोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

3 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

4 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

4 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

4 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

5 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

8 तास ago