महाराष्ट्र

शिंदे मुख्यमंत्री होणार? चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पूर्णविराम; म्हणाले…

मुंबई: राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असतानाच मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करून यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती.

या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता असते आणि ज्या पक्षाकडे स्वतःचे १३७ आमदार आहेत, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहील. त्यामुळे अशा चर्चांमुळे ना मी विचलित होतो, ना शिंदे साहेब. प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे, पण वास्तव वेगळे असते.”मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना यानिमित्ताने त्यांनी पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या खासदारांनी “विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला,” असे स्पष्टीकरण दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, निधी हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकते. विकास प्रकल्प, सामाजिक प्रश्न, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील भूमिका आणि नेतृत्वावरील विश्वास यांचाही निर्णयावर परिणाम होत असतो.”राजकारणात प्रत्येकजण आपल्या राजकीय भविष्यासाठी निर्णय घेत असतो. नेतृत्व आपले भविष्य सुरक्षित करू शकत नाही, अशी भावना निर्माण झाली तर पक्षांतर होणे स्वाभाविक असते,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

6 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

6 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

6 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

7 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

17 तास ago