मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेसचा सच्चा पाईक व कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
नाशिक शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक व कामगार क्षेत्रात जयप्रकाश छाजेड सक्रीय असायचे. पक्ष संघटनेसोबतच कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत व कामगारांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छाजेड यांनी युवक काँग्रेसपासून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती.
नाशिक शहर व राज्य पातळीवर त्यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले. विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी सार्थ ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांच्या हितासाठी लढणारा एक आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. जयप्रकाश छाजेड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी छाजेड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…