महाराष्ट्र

आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता करा…

भाजप आमदाराचा भाजपला घरचा आहेर; विकास निधी मिळत नसल्याची तक्रार…

मुंबई: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार वर्ध्याचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करुन नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता भाजपने करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदारांना विकास निधी मिळत नसल्याची तक्रार भाजप व शिंदे गटाचे नेते नेहमी ओरडून – ओरडून करत होते. शिवाय या निधी वाटपावरून आघाडी तुटणार असे वक्तव्य करत होते मात्र आज भाजप आमदारच विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करत आहेत याकडे महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबईत आले असतानाच भाजप आमदार दादाराव केचे यांनी ही तक्रार केली आहे त्यामुळे या तक्रारीला अधिक महत्त्व आले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

8 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago