महाराष्ट्र

पाण्याचा अंदाज चुकला अन्न पवना धरण परिसरात तरुणाचा बुडून मृत्यू

पुणे: मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. धरणात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून ऋतिक कैलास साखरे असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक साखरे हे आपल्या काही मित्रांसह पर्यटनासाठी पवना धरण परिसरात आले होते. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत असताना सर्वजण धरणाजवळ थांबले. दरम्यान, पोहण्यासाठी धरणात उतरलेल्या ऋतिक यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज आला नाही. पुढे जात असताना ते खोल पाण्यात गेले आणि काही क्षणांतच बुडू लागले. मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रयत्न अपयशी ठरले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला कळवले. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे बचाव पथक, स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ऋतिक यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

या घटनेमुळे साखरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात घडलेल्या या दुर्घटनेने मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिक शोकाकुल झाले आहेत.

धरण परिसरात खबरदारीचे आवाहन

पवना धरण परिसरात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, पाण्याची खोली, अचानक वाढणारा प्रवाह आणि सुरक्षेच्या अभावामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने नागरिकांना धरण परिसरात फिरताना तसेच पाण्यात उतरताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पोहण्यासाठी अधिकृत आणि सुरक्षित ठिकाणांचाच वापर करावा, मद्यपान करून पाण्यात उतरू नये तसेच आवश्यक सुरक्षासाधनांसहच पाण्यात उतरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निष्काळजीपणामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

3 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

3 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

9 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

9 तास ago