मनोरंजन

‘धर्मवीर’साठी १७ पुरस्कार मिळाले, पण राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याची खंत; प्रसाद ओक

मुंबई: धर्मवीर आणि धर्मवीर २ या दोन्ही मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त छाप पाडली. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटांची निर्मिती केली.

या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना त्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे तब्बल १७ पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या या कामगिरीची नोंद करण्यात आली आहे.

“राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता”

नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओक यांनी मनातील खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “‘धर्मवीर’ चित्रपटासाठी मला १७ पुरस्कार मिळाले असले तरी अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याची थोडी खंत आहे. दिग्दर्शक म्हणून मला ‘कच्च लिंबू’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला; पण अभिनेता म्हणूनही तो मान मिळावा, अशी इच्छा आहे. भविष्यात अजून चांगलं काम करून राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल.”

ऑस्करबाबत बोलताना ते म्हणाले की, “ऑस्करची फारशी अपेक्षा नाही; मात्र आपल्या देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याची नक्कीच इच्छा आहे.”

‘धर्मवीर ३’बाबत काय म्हणाले?

धर्मवीर ३ संदर्भात विचारले असता प्रसाद ओक म्हणाले की, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. “मंगेश देसाई यांच्या मनात असेल, तर ते योग्य वेळी घोषणा करतील. सध्या प्रवीण तरडे ‘देऊळ बंद २’मध्ये व्यग्र आहेत, तर मंगेश देसाई इतर प्रकल्पांमध्ये गुंतले आहेत. मात्र ‘धर्मवीर ३’ व्हावा, अशी माझी इच्छा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी चित्रपटांची उत्सुकता

प्रसाद ओक यांनी आगामी प्रकल्पांबद्दलही माहिती दिली. ‘महापरिनिर्वाण’ या मोठ्या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय ‘एफआयआर ४६९’ आणि ‘वारी’ हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.

यासोबतच दिग्दर्शक म्हणून पुढील वर्षी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या बायोपिकचे काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ‘भद्रकाली’ या चित्रपटाचं कामही लवकरच सुरू होणार आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओक आगामी काळात विविध प्रकल्पांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

4 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

5 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

10 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

11 तास ago