water
मुंबईः भारतातील नागरिक काय जुगाड करतील काही नेम नाही. अनेकजण असे काही भन्नाट उपाय शोधून काढतात की त्यांच्यापुढे भलेभले इंजिनिअर्स चाट पडतील. रोजच्या वापरातील वस्तू वापरुन मोठ्या मोठ्या गोष्टीही ठिक करतात. सोशल मीडियावर तर असे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. त्यातील व्यक्तीने केलेला जुगाड पाहून प्रसिद्ध उद्योगपतीही त्याचे कौतुक करण्यावाचून स्वतःला थांबवू शकले नाही.
आरपीजी ग्रुपचे चेअरपर्सन हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर भारतातील नळ, जुगाड असे शीर्षक दिले आहे. हर्ष गोयंका यांनी व्हिडिओ ट्विट करताच सोशल मीडियावर अनेकांची त्यावर कमेंट करुन हा जुगाड भन्नाट असल्याचे मत दिले आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका पाइपला रिकामी टुथपेस्ट जोडलेली दिसत आहे. तर, टुथपेस्टचे झाकण उघडताच पाणी येताना दिसत आहे. समोरच एक पाण्याची बादली ठेवलेलीही दिसत आहे. टुथपेस्टचे झाकण बंद केल्यास पुन्हा पाणी येणे बंद होत आहे. थोडक्यात काय तर, रिकाम्या टुथपेस्टचा वापर नळ म्हणून करण्यात आला आहे.
एक टाकी दिसत असून त्यात पाणी आहे. पण, या टाकीचा नळ तुटला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच रिकाम्या टुथपेस्टचा वापर नळ म्हणून केला आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर गरजेच्या कामासाठी केल्याचे पाहून हर्ष गोयंकाही खुश झाले आहेत. त्यांना हा जुगाड फारच आवडला आहे. हर्ष गोयंका यांनी पोस्ट केलेला या व्हिडिओ अनेकांनी पाहिला असून, प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
Video: रुग्णालयात भुताटकी? रात्रीच्यावेळी लाकडी शिडी लागली आपोआप चालू…
Video: फणा काढलेल्या कोब्रासोबत गाईने काय केले पाहा…
Video : म्हशीच्या अंगावर थाटात उभा राहून कुत्र्याचा स्वॅग…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …