Categories: राजकीय

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे.

अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून कार्यकर्ते तयारीत आहेत. वाढदिवस, लग्न समारंभ, दशक्रिया अशा सगळ्याच कार्यक्रमांना हजेरी लावून कार्यकर्ते स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेचे दावेदार फक्त आम्हीच अशा प्रकारे जनतेवर राज्य करू पाहणारे प्रत्येक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य झाल्याच्या आविर्भावात वागत आहेत. स्वतःची प्रसिध्दी स्वतः करून घेण्यासाठी प्रत्येक घडामोडींची सोशल मीडिया द्वारे प्रसिध्दी केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परीषद सदस्य पदासाठी सुनिता गावडे, राजेंद्र गावडे, दामुशेठ घोडे, भाजपाकडून सावित्राशेठ थोरात, शिवसेनेकडून डॉ. सुभाष पोकळे, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे या चारही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून, जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहे. पंचायत समिती सदस्य पदासाठी फोडाफोडीचे तसेच उमेदवारावर माघार घेण्यासाठी दबाव आणू शकतात या कारणाने नावे गुपित ठेवली जात आहे. त्यामुळे या गटात राजकिय वातावरण चांगलेच तापले असून आता चौरंगी लढत होणार का? तसेच या चौरंगी लढतीमुळे मतदारांपुढे डोकेदुखी वाढणार असून मते कोणाच्या पारडयात जाणार याकडे लक्ष लागणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसकडून अनेक जण इच्छुक असून कोणाला उमेदवारी मिळणार, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी होणार का? हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

17 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

17 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

17 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

17 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

17 तास ago