आरमोरी: महाराष्ट्राला थोर संतांचा वीरांचा वारसा लाभला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन पक्ष फोडून सरकार बनवण्यात आले. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखतीत सांगितले की सरकार पाडण्याच्या बैठकीत अदानी उपस्थित होते. महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गुजरातच्या व्यापाराच्या हातात गेले. महाराष्ट्रातील प्रकल्प, जमिनी गुजरातच्या व्यापाऱ्याच्या घशात घालण्यात आले. महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का लागला आहे. महाराष्ट्राची ही निवडणूक तो स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आहे अशी टीका काँग्रेसचे स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांनी केली.
आरमोरी इथे आज महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकीत भाजप अडचणीत आली की त्यांना धर्म आठवतो. धर्मांधतेच्या नावावर विष पेरून समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व गुजरातच्या चरणी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवणाऱ्या धडा शिकवा असा प्रहार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
यावेळी पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की, भाजपवाले हे धर्मयुद्ध असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहे. हे धर्मयुद्ध असेल तर आम्ही पण सोबत आहोत. पण हे युद्ध रोजगारासाठी , शेतकऱ्यांसाठी लढणार का, असा सवाल कन्हैया कुमार यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी हे जुमलेवादांचे सरदार आहे. ते सांगतात आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालोत. मात्र वास्तव्यात येथील 80 कोटी जनता आजही पाच किलो मोफत धान्याच्या रांगेत उभी आहे. सत्तेच्या अहंकारात भाजप सरकार हे उद्योगपती अदानीचे हित जोपासत आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम राबविला असून उद्योग पळविणाऱ्या तरुणांच्या हातून काम हिरावणाऱ्या महायुतीला सत्तेतून बेदखल करा असे आवाहन त्यांनी केले.
तर उपस्थिताना संबोधित करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर म्हणाले की, महाराष्ट्रातील लुटारू, असंवैधानिक ,खोकेबाज सरकारने जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी ही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्ज माफ, महिला भगिनींना प्रतिमाह 3000 रुपये, सुशिक्षित बेरोजगारांना ४ हजार रुपये प्रतिमाह बेरोजगार भत्ता, महिलांना मोफत एसटी प्रवास व विविध विकास योजना कार्यान्वित करणार आहोत. आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात वरखडे गुरुजींना आमदार केलं आता रामदास मसराम या गुरुजींना आमदार करू, ते नक्कीच विजयी होतील.
खासदार डॉक्टर किरसान म्हणाले की, लोकसभेत ज्या मताधिक्याने तुम्ही मला निवडून दिले त्याच एकसंघ व एकजुटीने रामदास मसराम गुरुजींना निवडून द्या. काँग्रेस पक्षाने तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाने मला उमेदवारी दिली, या विश्वासावर खरा उतरून मी जनसेवेकरिता कार्य करेन,असे महाविकास आघाडी उमेदवार रामदास मसराम म्हणाले. आयोजित सभेस बहुसंख्येने महिला भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…