राजकीय

‘सबसीडी’ सोडण्यासाठी गरीब लाभार्थ्यांना शासनाकडून सक्ती: अजित पवार

मुंबई: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकडून सक्तीने आणि फसवून ‘सबसीडी’ सोडून देण्याचे अर्ज भरुन घेण्याचे काम अनेक रेशन दुकानातून सुरु आहे. त्यामुळे अनेक गरजू, गरीब लाभार्थी अंत्योदय योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत हे प्रकार थांबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पाँईंट ऑफ ऑर्डर अंतर्गत केली. ही बाब गंभीर असल्याचे मान्य करत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत चौकशी करुन असे प्रकार घडत असतील ते थांबविण्याचे आदेश दिले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रती शिक्षापत्रिका दरमहा ३५ किलो आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य सवलतीच्या दराने शिधावाटप दुकानामध्ये दिले जाते. दिनांक १९ ऑक्टोबर २०१६ रोजी शासनाने निर्णय जाहीर करून ज्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य घेण्याची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे व त्यासाठी संमती पत्राचा अर्ज शिधावाटप कार्यालयाकडे सादर करण्याची अनुदानातून बाहेर पडा योजना सुरु केली आहे.

मात्र मागील काही दिवसापासून शिधावाटप दुकानदारांद्वारे गोरगरीब, अशिक्षीत लाभार्थ्यांकडून या योजनेचे अर्ज त्यांना योजनेची माहिती न देता सह्या करुन घेण्यात येत आहेत. राज्यातील ११.२३ कोटी जनतेपैकी ७ कोटी जनतेला या योजनेत हक्काचे धान्य मिळत होते. गरीब व गरजू लोकांना आपली भुक भागवता यावी, त्यांना प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा संमत करण्यात आला.

महाविकास आघाडी शासनाने कोविड काळात या लाभार्थ्यांना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय देखील घेतलेला होता. परंतू अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून त्यांच्या शिधावाटप दुकानातून गोरगरीब जनतेला फसवून अन्न सुरक्षा अधिनियमातील ही सवलत काढून घेण्याचा प्रकार सुरू आहे. हे प्रकार तातडीने थांबिवण्याची मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

14 तास ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

15 तास ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

2 दिवस ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

2 दिवस ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

3 दिवस ago