राजकीय

स्व. पांडुरंग फुंडकर यांचे टेक्सटाईल पार्कच स्वप्न सरकारने साकार कराव…

मुंबई: खामगाव येथे भाऊसाहेब तथा स्व. पांडुरंग फुंडकर यांचे टेक्सटाईल पार्कच स्वप्न सरकारने प्रत्यक्षात साकार करावं, ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात वि.स. पागे संसदीय प्रकाशन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आयोजित स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या जीवनकार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित “भूमिपुत्र” या स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्यातील भाषणात विरोधी पक्षनेते दानवे हे बोलत होते. विरोधी पक्षनेते दानवे यांनी केलेल्या टेक्स्टाईल पार्क उभारणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत त्यांच्या भाषणात पुंडकर यांच्या टेक्स्टाईल पार्क उभारणी बाबत सरकार नक्की विचार करेल अशी ग्वाही दिली.

भाऊसाहेब यांनी खामगाव ते आमगाव शेतकरी दिंडी काढली होती. त्याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष होते. माजी कृषीमंत्री स्व. पांडुरंग फुंडकर हे भाजपचे वरिष्ठ नेते होते तरी सर्व पक्षात त्यांचा आदर व सन्मान होता. गेले ७ वर्षे त्यांनी विधिमंडळ असेल किंवा सत्ताधारी पक्षात त्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. त्यावेळी सर्व भाजपचा विरोध करत असताना भाऊसाहेब यांनी नेटाने पक्षाच काम केलं. सर्व जबाबदाऱ्या उत्तम पार पाडल्या. त्यांचं सर्व ठिकाणी उत्तम समनव्य होतं असे दानवे म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते राम नाईक विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुनीता फुंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

7 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

19 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

20 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago