शिरूर तालुका

देशसेवा करताना पिंपरखेड गावचे वीर जवान बबनराव टाकळकर यांना विरगती प्राप्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावचे वीर जवान कै. मेजर बबनराव गेणभाऊ टाकळकर यांना आज सेवेवर असताना अल्पशा आजाराने वीरगती प्राप्त झाली. CRPF मध्ये त्यांनी ३१ वर्षे सैन्य दलामध्ये देशाची सेवा केली.

एप्रिल १९९१ मध्ये त्यांनी अवडी येथे सेवेची सुरुवात केली. त्यानंतर, पंजाब, इंफाळ, दिल्ली, त्रिपुरा, एस एन आर, छत्तीसगड, दिल्ली, एस एन आर, छत्तीसगड, मुंबई व सध्या ते जम्मु काश्मीर मध्ये श्रीनगर येथे केंद्रीय राखीव फोर्स मध्ये देशसेवा करत होते.

त्यांच्या निधनाने गावासह शिरुर तालुक्यात शोककळा पसरली असून पिंपरखेड ग्रामस्थ सर्व दुकाने बंद ठेवून एक दिवसाचा दुखवटा पाळणार आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या बुधवार (दि.७) सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. पिंपरखेड (ता. शिरुर) येथे घोडनदीतीरावर शासकीय इतमामात होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

19 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

7 दिवस ago