राजकीय

9 ऑक्टोबर ला शिरुर लोकसभा मतदार संघातील युवासेनेच्या पदांकरिता मुलाखती…

पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरुर लोकसभा मतदार संघातील युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येणार आहेत. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्या युवासेनेच्या सक्रीय सदस्यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरुर लोकसभा संघातील युवासेनेच्या पदांकरिता रविवार (दि. ९) ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते १.३० वाजेच्या दरम्यान जुन्नर व आंबेगाव विधानसभा संघातील पदांकरिता नारायणगाव येथील हॉटेल सचिन या ठिकाणी तर भोसरी, हडपसर, शिरुर-हवेली व खेड विधानसभा संघातील पदांकरिता कुरळी येथील हॉटेल साई सागर या ठिकाणी होणार आहेत. याबाबत युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.

इच्छुक सक्रीय सदस्यांनी मुलाखती पूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. येताना छायाचित्र सोबत असणे आवश्यक असून इच्छुक कार्यकर्त्यांसाठी मुलाखतीच्या ठिकाणी माहिती अर्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती युवासेना महाराष्ट्र राज्य सह सचिव विशाल सातव पाटील व युवासेना जिल्हा सरचिटणीस ॲड. शरद बांदल यांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

12 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

12 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

12 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

12 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

17 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

18 तास ago