क्राईम

बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथील सचिन जोरी या तरुणाची बिबट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गावातील शिस्तारवस्ती येथील मंगेश सुरेश चव्हाण (वय ३३) या तरुणावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. चव्हाण हे रात्री साडेबारा च्या दरम्यान कांद्याच्या रोपांना पाणी देऊन आपल्या दुचाकीवरुन घराकडे परतत असताना शिस्तार वस्ती येथील ओढ्यानाजिक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला.

आरडाओरड करुन चव्हाण यांनी तेथून पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने ते थोडक्यात बचावले. मात्र या हल्ल्यात त्यांच्या पायाला व हाताला जखमा झाल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, दिनेश गाजरे, आनंद जगताप यांनी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती कळताच शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी गणेश पवार, ऋषिकेश लाड, सविता चव्हाण व महेंद्र दाते यांनी तातडीने घटनास्थळी पिंजरा लावला असून रुग्णालयात धाव घेतली आहे.

बेट भागातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, वडनेर खुर्द, चांडोह या परिसरात मागील दोन ते तीन महिन्यात बिबट हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले तरी या परिसरात बिबट्यांची संख्या मोठी असून अन्न पाण्याचा शोधात त्यांचा मुक्त संचार वाढलेला आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी मोठी भीती निर्माण झाली असून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे यामुळे धोकेदायक बनले असल्याने आम्हास दिवसा वीज मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

बिबट्यांची वाढलेली संख्या हि जीवघेणी ठरत असताना महावितरण विभागाने या गोष्टींची दखल घेणे गरजेचे आहे. तर रात्री अपरात्री बाहेर पडताना शेतकरी व ग्रामस्थांनी योग्य काळजी घ्यावी. हातात काठी, बॅटरी तसेच मोबाईलवर गाणी वाजवावीत व शक्यतो एकट्याने बाहेर पडणे टाळावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

7 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

19 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

20 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago