क्राईम

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर सिलेंडर वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 4) रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास मुख्य चौकात नगर-पुणे रस्त्यावर शिरुरकडुन एक टेम्पो गॅसचे भरलेले सिलेंडर घेऊन जात होता. त्याचवेळी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर हे नवरात्रीनिमित्त गस्त घालत असताना त्यांनी हा टेम्पो अडवत टेम्पो ड्रायव्हरकडे चौकशी केली असता यात बेकायदेशीररीत्या सिलेंडर वाहतुक करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असुन सुमारे 5 लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 4) रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर हे नवरात्रीनिमित्त गस्त घालत असताना मुख्य चौकात नगर-पुणे रस्त्यावरुन एच.पी. गॅस एजन्सीचा टेम्पो क्र. एम एच 12 एल टी 4646 हा सायंकाळी 5.30 च्या सुमारास रांजणगावच्या दिशेने जात होता. याबाबत पोलिसांनी या टेम्पो चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी कसुन चौकशी केली असता. त्याने सदरचा टेम्पो हा शिरुर मार्केटयार्ड येथील सुमतीलाल दलीचंद दुग्गड यांच्या एच.पी. गॅस एजन्सीचा असुन सदर एजन्सीचे मालक सुमतीलाल दलीचंद दुग्गड आणि मॅनेजर जिवनसिंग देवीसिंग चव्हाण रा. शिरुर, ता. शिरूर, जि.पुणे यांच्या सांगण्यावरुन मी सदर गॅसच्या टाक्या शिरुर येथुन वाघोली येथे खाली करण्यासाठी घेवुन जात असल्याचे सांगितले.

याबाबत शिरुर तहसिलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अतुल अशोक गायकवाड (वय 34 ) यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन या टेम्पोत भारत गॅस कंपनीच्या 65 आणि एच पी कंपनीच्या 10 अशा एकुण 75 भरलेल्या कमर्शियल गॅसच्या टाक्या दिसुन आल्या. तसेच या गॅसच्या भरलेल्या काही टाक्यांना कोणत्याही प्रकारचे सिल केलेले नसुन त्या धोकादायक पध्दतीने टेम्पोमध्ये एकावर एक ठेवुन वाहतुक करताना आढळून आले असुन या टेम्पोच्या कॅबिनमध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भारत गॅस कंपनीचे गॅस सिलेंडरला सिल करण्यासाठी वापरण्यात येणारी प्लॅस्टिकच्या कॅप असलेल्या पाच पिवळ्या रंगाच्या रिल मिळुन आले आहेत.

त्यामुळे रांजणगाव MIDC पोलिसांनी एच पी गॅसचा टेम्पो बेकायदेशिर व धोकादायक रित्या वाहतुक करतांना ताब्यात घेत सदर टेम्पोतील गॅस टाक्यांचा पंचनामा करुन कायदेशीर कारवाई केली असुन याबाबत टेम्पो चालक प्रेमसिंग देविसिंग चव्हाण सध्या रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर, मुळ (रा. खारिया अन्नावास, ता. पिंपार सिटी, जि. जोधपुर, राजस्थान), सुमतीलाल देवीचंद दुगड (रा. शिरुर, ता शिरुर, जि पुणे) जिवनसिंग देवीसिंग चव्हाण (रा. शिरुर, ता शिरुर जि पुणे) या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असुन टेम्पो चालक प्रेमसिंग चव्हाण याला पोलिसांनी अटक केली असुन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

2 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

4 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

4 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

4 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

5 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

7 दिवस ago