राजकीय

जनतेच्या मुद्द्यांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष, दिल्लीत महागाई विरोधात काँग्रेसची महारॅली…

मुंबई: देशात आज सर्वात मोठी समस्या महागाई व बेरोजगारी असून महागाई कमी करण्यात व तरुणांना नोकरी देण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅससह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. जनता महागाईने त्रस्त झाली असताना मोदी सरकार मात्र या मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांना पुढे रेटत आहे. देशात सध्या कोणाचीही लाट नसून केवळ महागाई, चिंता व निराशेची लाट आहे, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी केली आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पवन खेरा म्हणाले की, महागाई आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे व त्यावर सरकारकडे उत्तरही नाही, सरकार महागाईच्या मुद्द्यावर बोलण्यास घाबरत आहे. केंद्र सरकारचे महागाई संदर्भात करत असलेले दावे धादांत खोटे असून UPA सरकार व NDA सरकारच्या काळातील किमतीची तुलना केली तर महागाई किती प्रचंड वाढली आहे हे लक्षात येते.

डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील UPA सरकारच्या काळात एसपीजी सिलिंडर ४१० रुपयाला मिळत होते ते आज १०५३ रुपयाला झाले आहे म्हणजे तब्बल १५६ टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा १०७ डॉलरचा दर असताना UPA सरकारने ७५ रुपयांच्या वर पेट्रोलचा दर जाऊ दिला नाही पण आज कच्च्या तेलाचा दर ९७ डॉलर असतानाही पेट्रोल १०६ रुपये लिटर तर डिझेल ९७ रुपये लिटर आहे.

गॅसचे वाढते दर परवडत नसल्याने उज्ज्वला गॅस कनेक्शन घेतलेल्यांना दुसरा सिलिंडर घेणे परवत नाही. कोवीड नंतर महागाई वाढली हा भाजपा सरकारचा दावा धादांत खोटा आहे. दुध, दही, आटा, पनीरवर जीएसटी लावणार नाही असे छातीठोकपणे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांनीच आता यावर जीएसटी लावला आहे. नोटबंदी करुन काय साध्य केले हे भाजपालाच कळले नाही. जीएसटीची अंमलबजावणी करतानाही मध्यरात्री मोठा इव्हेंट केला. मोदी हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात पटाईत आहेत.

महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त असून काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावर अनेकवेळा रस्त्यावर उतरुन आंदोलने केली आहेत. संसदेतही मोदी सरकारला महागाईच्या प्रश्नावर जाब विचारला पण मोदी संसदेत बसतच नाहीत. काँग्रेस पक्ष मात्र जनतेचे मुद्दे सातत्याने लावून धरत आहे. ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेसने महागाईच्या मुद्द्यावरच मोठ्या रॅलीचे आयोजन केले असून झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्याचे काम यावेळी केले जाणार आहे, असेही पवन खेरा यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजितसिंह सप्रा, प्रदेश सरचिटणीस डॉ. राजू वाघमारे, सुनिल अहिरे, युवराज मोहिते हे उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

47 मि. ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago