राजकीय

अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून तगडा उमेदवार तयार…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असून, अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अजित पवार गटाकडून शिरुरमधून कोण लढणार? या प्रश्नाची चर्चा सुरु झाली आणि तगड्या उमेदवाराचे नाव समोर आले.

शिरुर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. पाच वर्षात एका खासदाराने शिरुर मतदार संघाकडे लक्ष दिले नाही. त्यांच्यामुळे हा मतदारसंघ दुर्लक्षित राहिला होता. या ठिकाणावरुन त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केले होते. आता तेथे आपला असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असे अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली आहे.

अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. अमोल कोल्हे निष्क्रिय खासदार आहे. शिरूर लोकसभेसाठी आता त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचे अजित पवार यांनी सोमवारी म्हटले. हा उमेदवार मी जिंकून आणणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आता भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपली इच्छी जाहीरपणे व्यक्त केली. अजितदादांनी संधी दिली तर खासदारकी लढणार आहे, असे विलास लांडे यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना म्हटले आहे. मागील वेळेस आपली तयारी होती. त्यावेळी अमोल कोल्हे यांना संधी दिली गेली. मी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करुन थांबलो. परंतु आता आपली शंभर टक्के तयारी आहे.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघाची मतदारांची संख्या 23 लाखांची आहे. या मतदार संघासाठी विलास लांडे 2019 मध्ये इच्छूक होते. त्यावेळी अमोल कोल्हे यांच्यामुळे त्यांची संधी गेली. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार गटाकडून त्यांनी तयारी चालवली आहे. त्यांच्या वाढदिवसांनिमित्त मतदार संघात फ्लेक्स लावले होते. त्यात त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर लांडे यांना बळ मिळाले आहे.

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची राष्ट्रवादीकडून घोषणा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

6 मिनिटे ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

2 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago