राजकीय

विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय सामंत विजयी

रत्नागिरी: 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय रविंद्र सामंत हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. बाळ माने यांना दुसऱ्या क्रमांकाची 69 हजार 745 इतकी मते मिळाली. येथील सामाजिक न्याय भवन मध्ये आज सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक जनक प्रसाद पाठक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट देऊन मतमोजणी प्रक्रियेची पाहणी केली. पहिल्या फेरीपासूनच श्री. सामंत हे आघाडीवर होते. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देसाई यांनी मतमोजणी नंतर सर्वाधिक मते मिळालेल्या श्री. सामंत यांना विजयी घोषित केले. यानंतर त्यांनी प्रमाणपत्र आणि बुके देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक श्री. पाठक उपस्थित होते.

उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे 

उदय रविंद्र सामंत:- 1,10,327, टपाली मते-1008 एकूण 1,11,335,

बाळ माने:- 68,854, टपाली मते- 891 एकूण – 69,745,

भरत सीताराम पवार:- 972, टपाली मते – 30 एकूण 1002,

कैस नुरमहमद फणसोपकर:- 306, टपाली मते – 3 एकूण 309,

कोमल किशोर तोडणकर:- 188, टपाली मते – 6, एकूण 194,

ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील:- 1043, टपाली मते-18, एकूण 1061,

दिलीप काशिनाथ यादव:- 275, टपाली मते – 5, एकूण 280,

पंकज प्रताप तोडणकर:- 599, टपाली मते -4, एकूण 603.

नोटा – 3029, टपाली मते 44 एकूण 3073, एकूण वैध मते – 1,85,593, टपाली मते- 2009, एकूण 1,87,602,

अवैध मते – टपाली मते 306.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

13 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

14 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

19 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

22 तास ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

1 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

1 दिवस ago