कुटुंब देवदर्शनाला अन चोरट्यांचा घरावर डल्ला: गुन्हे दाखल

शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील खळबळजनक घटना

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एक कुटुंब देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेला असताना अज्ञात चोरट्यांनी सदर घरावर डल्ला मारुन घरातील ६० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील अनिल भालेराव हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले होते. (२३) जून रोजी रात्रीच्या सुमारास भालेराव हे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास देवदर्शन हून घरी आले असता त्यांच्या घरासमोर एक अज्ञात युवक उभा होता. भालेराव यांची कार घरासमोर येताच सदर युवकासह भालेराव यांच्या घरातून २ असे तिन युवक पळून जावू लागले. त्यावेळी भालेराव यांच्या सह सर्वांनी त्या युवकांचा पाठलाग केला. मात्र तिघे युवक पळून गेले. त्यामुळे भालेराव यांनी घराची पाहणी केली असता अज्ञात युवकांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील तब्बल ६० हजार रुपयांवर अज्ञात तिघा चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले.

याबाबत अनिल सदाशिव भालेराव (वय २८) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ३ अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

3 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

9 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

9 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

10 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

10 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

10 तास ago