पुणे नगर महामार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू

पुणे नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथील घटना

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत कल्याणी चौकात दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात तिघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून गुरुदास दत्तात्रय सुर्यवंशी, सागर गुरु नानावत व सुदानंद अनिल नानावत असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. Koregaon Bhima

कोरेगांव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून २४ जून रोजी रात्रीच्या सुमारास महामार्गावरील अहमदनगर बाजूने गुरुदास सुर्यवंशी हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ एल जी ५५४८ या दुचाकी हून येत असताना समोरून पुणे बाजूने सदानंद नानावत व सागर नानावत हे दोघे विना नंबरच्या दुचाकीहून आले. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यावेळी अपघातात तिघे युवक गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिघा युवकांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे.

या अपघातात कोरेगाव भीमा येथील सलून व्यावसायिक गुरुदास दत्तात्रय सुर्यवंशी (वय ५०) रा. दामोदर नगर कोरेगाव भीमा (ता. शिरुर), सागर गुरु नानावत (वय १७) रा. शेरेवस्ती धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे व सुदानंद अनिल नानावत (वय १८) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या तिघा युवकांचा मृत्यू झाला असून याबाबत ऋषिकेश अंबना तळके (वय २४) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. कडणी ता. शिंदगी जि. वाजापुर राज्य कर्नाटक याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके करत आहे.

चौकात पांढरे पट्टे व ब्लिंकरची गरज…
कोरेगाव भीमासह पुणे नगर महामार्ग रस्त्याचे सहापदरीचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने वाहने वेगात जात आहेत. मात्र रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांच्याही अपघातात जीवावर बेतत असल्याने चौकांमध्ये पांढरे पट्टे व ब्लिंकर बसविण्याची मागणी सरपंच अमोल गव्हाणे यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

14 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago