शिरुर तालुक्यासाठी 1100 कोटींच्या सिंचन प्रकल्पाला गती; सिंचन भवनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक

शिरुर (तेजस फडके) पुणे येथील सिंचन भवनात येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिरुर तालुक्यातील पाणीपुरवठा तसेच सिंचन प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. हि बैठक आमदार अ‍ॅड राहुल कुल यांच्या विशेष प्रयत्नातून आज (दि 10) रोजी सकाळी 10 च्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर, मुख्य अभियंता धुमाळ यांच्यासह भाजपचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे, शिरुर तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सतीश पाचंगे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष समरजीत गायकवाड, हिवरे कुंभारचे माजी सरपंच दिपक खैरे, विकास गायकवाड, राहुल कदम, बापुसो धुमाळ आणि आदित्य सासवडे, गणेश कामठे , पंकज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंचन प्रकल्पाला गती देणारे महत्त्वाचे निर्णय…

या बैठकीत पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्पांबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सदर प्रकल्पासाठी 1.14 टिएमसी पाणी उपलब्ध असून त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास 30 मे पर्यंत मंजुरी अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत एकूण 12 गावे लाभार्थी ठरणार असून सुमारे 1000 मिमी क्षमतेची पाइपलाईन उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 1100 कोटी इतका आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती देण्यासाठी बॅरेज डिझाईनचे काम तातडीने सुरु करण्याचे तसेच कन्सल्टंटची नियुक्ती लवकरात लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय संपुर्ण प्रकल्पासाठी स्पष्ट टाइमलाइन सादर करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मे अखेरपर्यंत लिफ्ट इरिगेशन स्कीम (LIS) साठी जनरल लेआउट व बॅरेज लेआउट तयार करणे अपेक्षित असून जून महिन्यापर्यंत प्रकल्पाचा सविस्तर अंदाज (Estimate) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच 30 जूनपर्यंत प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यावर भर देण्यात आला.

तसेच पाणीपुरवठा डिझाईन 30 मेपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रकल्पाची अंमलबजावणी कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. यासोबतच 15 जुलैपर्यंत SLTC साठी फाईल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पामध्ये 100 टक्के सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्यात आला असून पर्यावरणपुरक विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. चासकमान कालवा, शिक्रापुर शाखा क्र. 2 येथे मंजूर असलेली 15 पदे तातडीने भरण्याचे आदेश देण्यात आले. तसेच जातेगाव बुद्रुक येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे नादुरुस्त दरवाजे बदलण्याच्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आले.

आमदार कुल यांच्या प्रयत्नांचे कौतुक…

या बैठकीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी आमदार राहुल कुल यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच ही बैठक पार पडून प्रकल्पाला गती मिळाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. सदर प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर शिरुर तालुक्यातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.

शिरुरमध्ये ATS ने धडक कारवाई करत गावठी पिस्टलसह दोघांना घेतले ताब्यात

शिरुरमध्ये एटीएसचा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त

शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा

शिरुर; माता नव्हे तु वैरीणी! मातृत्वाला काळिमा फासत अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा खून

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

20 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

20 तास ago

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…

20 तास ago

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…

20 तास ago

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…

20 तास ago

मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’; दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार दशावताराचा सोहळा

मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…

20 तास ago