मुख्य बातम्या

शिरुरमध्ये ATS ने धडक कारवाई करत गावठी पिस्टलसह दोघांना घेतले ताब्यात

शिरुर (तेजस फडके) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शिरुर परिसरात धडक कारवाई करत दोन संशयित तरुणांना गावठी पिस्टलसह ताब्यात घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाढत्या अवैध शस्त्रसाठ्यावर अंकुश ठेवण्यासाठी सुरु असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणातून मोठ्या गुन्हेगारी साखळीचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आदेशानुसार अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु असताना ATS पथकाला शिरुर पोलीस ठाणे हद्दीत ‘सतरा कमान रोड’ परिसरात एका व्यक्तीकडे गावठी पिस्टल असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एटीएस (ATS) आणि शिरुर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने पांजरपोळ समोरील परिसरात सापळा रचत छापा टाकला.

या कारवाईत सुमित वसंत शेळके (वय २०, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि साजिद रफिक खान (वय ३०, रा. मंगलमूर्ती नगर, शिरुर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत सुमारे ५० हजार रुपये किमतीचे विनापरवाना गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत साजिद खान यानेच हे पिस्टल सुमित शेळके याला विक्री केल्याचे उघड झाले आहे. 

या दोन्ही आरोपींविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, सुमारे वर्षभरापुर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी परिसरात ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टच्या वादातून खुनाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा त्यांच्या नावावर नोंद आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक, तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, नीरज पिसाळ यांच्या पथकांने केलेली आहे.

दरम्यान आरोपींना शिरुर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेले पिस्टल नेमके कुठून आणले, त्यामागील उद्देश काय होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणते गुन्हेगारी नेटवर्क कार्यरत आहे का, याचा सखोल तपास शिरूर पोलीस करत आहेत. 

शिरुरमध्ये एटीएस चा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त

शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा

शिरुर; माता नव्हे तु वैरीणी! मातृत्वाला काळिमा फासत अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा खून

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

14 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

23 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

23 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago