उत्तर प्रदेश मधील भीमा भारती हा युवक झाला कोरेगाव भीमात दाखल
शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी या शौर्यदिनी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखो भीम सैनिक येत असताना नुकतेच येथे नव्याने भीमसैनिक दाखल होण्यास सुरुवात झालेली असताना चक्क उत्तर प्रदेश येथून जात तोडो समाज जोडो हा संदेश देण्यासाठी भीमा भारती हा भीम सैनिक तब्बल चक्क 2 हजार 100 किलोमीटर सायकल प्रवास करुन मानवंदना देण्यासाठी दाखल झाले आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथील जयस्तंभ अभिवादन सोहळ्याला मानवंदना देण्यासाठी नुकतेच ४ डिसेंबर २०२२ रोजी उत्तर प्रदेश राज्यातून जात तोडो समाज जोडो हा संदेश घेऊन भीमा भारती या भीम सैनिकाने सायकल वरुन तब्बल 2 हजार 100 किलोमिटर प्रवास केला. प्रवासा दरम्यान नागपूर येथील दीक्षाभूमीवर नतमस्तक झाल्यानंतर ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास भीमा भारती हा विजयस्तंभला अभिवादन करण्यासाठी दाखल झाला असून त्याचे धम्म भंते यांनी स्वागत केले आहे.
भीमा भारती या युवकाने उत्तरप्रदेश आग्रा, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, कोरेगाव भीमा असा प्रवास करत जयस्तंभ येथे हजेरी लावली आहे, या भीमसैनिकाने जाती अंतासाठी आपला लढा उभारला असून यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे. भीमा भारतीने उत्तरप्रदेश ते कोरेगाव भिमा सायकलवर प्रवास करत जाती अंत होऊन समाज जोडला जावा या विचाराच्या समर्थनार्थ जाती तोडो समाज जोडो हा संदेश जनतेला देण्यासाठी विशेष असे परिश्रम घेतले आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…