शिरूर तालुका

विजयस्तंभाच्या मानवंदनेने उर्जा मिळते; तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या जय स्तंभाला मानवंदना दिल्याने मोठी उर्जा मिळते, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे शौर्यदिनाच्या निमित्ताने नुकतीच जयस्तंभ येथे हजेरी लावत तृप्री देसाई यांनी जयस्तंभास अभिवादान केले. यावेळी प्रशांत देसाई, आकाश वढवराव, प्रमोद कुतवळ, मंगल सासवडे, संगीता तावरे, रीना सोनवणे, रमा आठवले, रुख्मिणी बोबडे, अपेक्षा सोनवणे यांसह आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याची मानवंदना देण्यासाठी नागरिक येथे येत असतात. यापूर्वी कोरोनाचे निर्बंध लादण्यात आलेले होते. मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने येथे 15 लाख भीमसैनिक येथे मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. येणाऱ्या समाज बांधवानी येथे येताना शांततेत यावे, असे आवाहन देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले.

शासनाचे सर्व नियम पाळल्यास शौर्यदिन शांततेत पार पडेल असे सांगत येथील कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समिती मोठे कष्ट घेत असते प्रत्येक नागरिकाला काहीही त्रास होणार नाही, महिलांचे नियोजन, येथील अनेक दुकानदार यांची विशेष काळजी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्यांचे सहकारी घेत असल्याने सदर समितीचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याने देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

10 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

10 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

10 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

11 तास ago