शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात शेतात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या

शिरुर वनविभाग व प्राणीमित्रांनी पंचनामा करत घेतले ताब्यात

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला असून शिरुर वनविभाग व वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या प्राणीमित्रांनी सदर मृत बिबट्याचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून दिला आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे नलिनी वर्पे यांच्या शेतात काही मेंढपाळ मेंढ्या चारत असताना त्यांना एक शेताच्या बांधावर एक बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. याबाबतची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनपरीमंडळ अधिकारी प्रवीण क्षीरसागर, वनरक्षक बबन दहातोंडे, प्रमोद पाटील, अभिजित सातपुते, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली यावेळी पोलीस पाटील वंदना साबळे, डॉ. नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, प्रसाद गुंजाळ, खंडू सोनवणे, काशिनाथ ढोकले, रोहिदास गुंजाळ, कैलास साकोरे, बाळू साकोरे, राहुल ढोकले यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान सदर ठिकाणी अंदाजे तीन वर्षे वयाची बिबट मादी मृतावस्थेत असल्याचे दिसून आले, यावेळी वन विभागाचे अधिकारी व प्राणीमित्रांनी पंचनामा करत मृत बिबट्या शवविच्छेदन साठी शिरुर येथील वनविभाग कार्यालय येथे पाठवून दिला, तर यावेळी बोलताना सदर बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन नंतर बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे वनपरीमंडळ अधिकारी प्रवीण क्षीरसागर यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

16 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

16 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

16 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

17 तास ago