शिरुर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकाने मराठा आरक्षणानंतर राबवलाय अनोखा उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा संदर्भात असलेल्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या नंतर संपुर्ण राज्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील हॉटेल व्यावसायिक संदीप कुटे यांनी मराठा आरक्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी आगळीवेगळी कल्पना राबवत स्वतःच्या हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या व्यक्तींना बिलात 20 टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावात मराठा आरक्षण मिळाल्यानंतर सकल मराठा सामाजाने फटाके फोडत, गुलाल उधळत आनंद साजरा केला. त्यामुळे आपणही समाजाचं काहीतरी देण लागतो. या भावनेतून रांजणगाव येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक संदीप कुटे यांनी अनोखी शक्कल लढवत त्यांच्या ‘हॉटेल संदीप’ मध्ये जेवायला येणाऱ्या व्यक्तीच्या बिलात 20 टक्के सुट दिली असुन दि 27 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत हि सुट दिली जाणार आहे.

आपल्या मराठा सामाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी ते मुंबई पर्यंत भव्य मोर्चा काढला. त्यामुळे अखेर 26 जानेवारी रोजी शासनाने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केल. त्यामुळे आपण समाजाचं काहीतरी देण लागतो. याचं उद्देशाने छत्रपती संभाजीनगर, विदर्भासह मराठवाड्यातुन या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या समाज बांधवाना परतीच्या प्रवासात आपण कमीत कमी पैशात जेवण द्यावं अशी संकल्पना माझ्या मनात आली. त्यामुळे मी हॉटेलच्या जेवणाच्या बिलात 20 टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला. तसेच शिरुर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून अनेकजण आमच्या हॉटेल मध्ये जेवायला येत असतात त्या सर्वांनाही दि 27 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत जेवणाच्या बिलावर आम्ही 20 टक्के सुट देणार आहोत.
संदीप कुटे
प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक
रांजणगाव गणपती

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

6 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago