शिरूर तालुका

रांजणगावचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांचा निरोप समारंभ; कर्मचाऱ्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी चांगले असुन त्यांचं टिमवर्क चांगल आहे. मी आजपर्यंत अनेक पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणुन काम केल. परंतु रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनची टिम ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम टिम होती. त्यांच्यासोबत काम करताना अनेक गुन्हे उघडकीस आणता आले. तसेच पोलिस स्टेशनला अनेक पुरस्कार मिळाले. हे यश सर्वांचंच आहे असे मत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांची सोलापुर ग्रामीण इथं बदली झाली. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने महेश ढवाण यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी महेश ढवाण यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. यावेळेस कर्मचाऱ्यांसह, पोलिस निरीक्षक ढवाण यांच्यासह उपस्थितांचेही डोळे पाणावले.

यावेळी पोलिस हवालदार माणिक काळकुटे, पांडुरंग साबळे ब्रम्हा पोवार, विलास आंबेकर, माऊली शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, निळकंठ तिडके, शिवाजी मुंढे, महिला पोलिस उपनिरीक्षक कविता काळे, कारेगावचे माजी उपसरपंच संदीप नवले यांनी भावना व्यक्त करत पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

13 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

13 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

14 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

19 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

19 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

19 तास ago