मुख्य बातम्या

शिरुरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप, विनापरवाना झाडे पाडत केले बांधकाम; कारवाई करा, नागरीकांची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता. शिरुर) येथील गट न.२६७ मध्ये वनविभागाची परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने निलगिरी, सिसम, लिंब अशी दहा झाडे पाडुन अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला असुन कोणतीही परवानगी न घेता मोठी झाडे तोडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबतची माहीती कवठे येमाई येथील ग्रामस्थ शरद उघडे यांनी दिली आहे.

 

तसेच जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर ठिकाणी बांधकामही केले असल्याचा आरोप शरद उघडे, अमर उघडे यांनी केला आहे. जर शासकीय आधिकारी नियम डावलुन बेकायदेशीरपणे वृक्ष तोडत असेल तर याला वेळी चाप बसणे गरजेचे आहे.

 

शिरुरचे तत्कालीन गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी काही महीन्यांपुर्वी शिरुर पंचायत समिती आवारातील वृक्ष कापले होते. त्याविषयी सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी नाथा पाचर्णे यांनी आवाज उठवत त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले होते. आता वनविभाग व जिल्हाधिकारी साहेब सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का…?की राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना पाठीशी घालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

याविषयी वनपरीक्षेत्र आधिकारी प्रताप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की या गट नंबरमध्ये वृक्ष काढण्याची कुठलीही परवानगी काढलेली नाही. त्यामुळे रीतसर पंचनामा करण्यात येईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

15 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago