शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरच्या धडकेने कंटेनरखाली चिरडून मेहरबान विठ्ठल गायकवाड हा व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोंढापुरी (ता. शिरुर) येथील मेहरबान गायकवाड हे आज २७ मे रोजी सकाळच्या सुमारास पुणे नगर महामार्गावरुन इंटीग्रेटेड कंपनीत कामाला जात असताना पाठीमागून एम एच १४ सि पी ४१७७ हा कंटेनर भरधाव वेगाने आला. त्याची धडक गायकवाड यांना बसून गायकवाड कंटेनरखाली चिरडले गेले.
दरम्यान अपघात होताच कंटेनरचालक कंटेनरचालक कंटेनर जागेवर सोडून पळून गेला. यावेळी येथील नागरिकांनी गायकवाड यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मेहरबान विठ्ठल गायकवाड (वय ५८) रा. गोगावले वस्ती कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांना मृत घोषित केले.
घडलेल्या घटनेबाबत अजय मेहरबान गायकवाड (वय ५८) रा. गोगावले वस्ती कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी कंटेनर वरील अज्ञात चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…