मुख्य बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी सहन केली जाणार नाही; खंडणीखोरांवर कठोर कारवाईचा इशारा

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर एमआयडीसी परिसरातील उद्योगांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. कंपन्यांना बेकायदेशीरपणे त्रास देणे, ठेके मिळवून देण्याच्या नावाखाली दबाव टाकणे किंवा खंडणीची मागणी करणाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.

शुक्रवारी (दि. ३) शिक्रापूर पोलीस ठाण्यात एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे एचआर व्यवस्थापक आणि प्रतिनिधी यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्योगांना कायद्याचे संरक्षण मिळावे आणि उद्योग-व्यवसाय सुरळीत सुरू राहावेत, या उद्देशाने बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत लेबर, स्क्रॅप, ट्रान्सपोर्ट, केटरिंग, सिक्युरिटी, हाऊसकिपिंग, पाणी टँकर किंवा इतर कोणत्याही कामांचे ठेके मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही व्यक्ती किंवा संघटना बेकायदेशीर दबाव टाकत असेल, पैसे किंवा खंडणीची मागणी करत असेल अथवा धमक्या देत असेल, तर त्याची तात्काळ माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

यावेळी एमआयडीसी परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, नियमित पोलीस गस्त वाढविणे, वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी नियोजन, कामगारांच्या सुरक्षेची काळजी तसेच परप्रांतीय कामगारांची माहिती व नोंदी अद्ययावत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उद्योगांना २४ तास आवश्यक ते सहकार्य व संरक्षण देण्याची ग्वाही शिक्रापूर पोलिसांनी दिली. कोणतीही संशयास्पद घटना किंवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास विलंब न करता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.उपस्थित कंपनी प्रतिनिधींनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत करत अशा समन्वय बैठका नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

बैठकीस क्रोमवेल इंजिनिअरिंगचे नीलेश गव्हाणे, संदीप दिवेकर, जॉन डीअरचे राम अहिरे, अलिकॉनच्या श्रीमती जाधव, हर्ष ओगलचे मारुती पाटील, मॅक अल्टीचे असलम परवेज यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी, तुषार भोर तसेच गोपनीय अंमलदार संदीप कारंडे आणि बापू जगताप उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

6 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

6 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

6 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

7 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

17 तास ago