शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता धामारी येथे पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्या घेऊन जाणारा ट्रक उलटला असून सुदैवाने कोणतीही हानी यामध्ये झाली नाही.
धामारी (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महा मार्गावरून आंबेगाव येथील लाखनगाव येथून पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे पॅक बंद बॉक्स घेऊन एम एच १४ जे एल ४६३३ हा ट्रक भरधाव वेगाने चालेलेला असताना अचानक ट्रकचा टायर फुटून अपघात झाला. दरम्यान ट्रक रस्त्यावरच आडवा होत त्यामधील पाण्याचे बॉक्स रस्त्याचे कडेला फेकले गेले.
दरम्यान रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. सुदैवाने यावेळी कोणतीही हानी झाली नसून पाण्याचे प्लॅस्टिकचे पॅक बंद बॉक्स असल्याने त्याचे देखील फारसे नुकसान झाले नाही. घटनेची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे व आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…