शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात बकरी धुत असताना तळ्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथे एका युवकाचा बकरी धुत असताना तोल जावून तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव चांगदेव पांढरे (वय ३३), रा. आंधळगाव, (ता. शिरूर) हे आपल्या चुलत भावांसोबत वड्याच्या तळ्याजवळ बकरी धुण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बकरी धुत असताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी तत्काळ शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर सतीश ठोंबरे यांना बोलावण्यात आले, त्यांनी पाण्यात बुडी मारून साहेबराव यांना बाहेर काढले. मात्र, त्यावेळी त्यांच्यात कोणतीही हालचाल नव्हती.

त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, न्हावरा येथे दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत साहेबराव यांचे चुलत भाऊ दादा सखाराम पांढरे यांनी मांडवगण फराटा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, हा एक दुर्दैवी अपघात असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खबाले करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

6 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

6 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

7 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

12 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

12 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

12 तास ago