शिरूर तालुका

तळेगाव ढमढेरेत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे प्रसाद अनिल रसाळ या युवकाने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे राहणारे प्रसाद रसाळ व त्याचे कुटुंबीय २१ जानेवारी रोजी रात्री जेवण करुन झोपले होते, सकाळच्या सुमारास प्रसाद बराच वेळ उठला नसल्याने त्याचे वडील अनिल यांनी त्याला आवाज दिला मात्र त्याने आतून कोणताही प्रतिसाद न दिल्याने शेजारील युवकांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता प्रसाद याने घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस हवलदार किशोर तेलंग, पोलीस पाटील पांडुरंग नरके यांनी सदर ठिकाणी धाव घेत पंचनामा करत मृतदेह छवविच्छेदन साठी पाठवून दिला, तर या घटनेत प्रसाद अनिल रसाळ (वय २२) रा. माळी मळा तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाला असून प्रसादच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याबाबत गणेश हनुमंत रसाळ (वय २७) रा. माळी मळा तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…

16 तास ago

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…

16 तास ago

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

1 दिवस ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

1 दिवस ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

1 दिवस ago