क्राईम

मांजरेवाडीत चासकमान कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) गावातील मांजरेवाडी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाजेवाडी (ता. शिरुर) गावातील मांजरेवाडी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांना दिसले याबाबतची माहिती मिळताच तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष कचरुनाना वाजे, पोलीस पाटील सोनाली वाजे, पोलीस हवालदार मंगेश लांडगे, पोलीस शिपाई भास्कर बुधवंत यांनी सदर ठिकाणी जात राजू मांजरे, आबा मांजरे, बंटी मांजरे, यांसह नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह पाण्याबाहेर काढत महिलेबाबत आजूबाजूला चौकशी केली असता काही माहिती मिळू शकली नाही.

याबाबत कचरुनाना रामचंद्र वाजे (वय ६५) रा. पाटील वस्ती वाजेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर महिलेचे वाय अंदाजे ४० ते ५० वर्षे, अंगात पिवळ्या रंगाची नववारी साडी, चोकलेटी रंगाचा ब्लाउज, गळ्यात काळी पोत व लाल दोरीमध्ये एक चावी, हातात लाल रंगाच्या बांगड्या असे वर्णन असून कोणासही महिलेबाबत काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ०२१३७२८६३३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

11 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

11 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

11 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

15 तास ago