मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात दरोडा सदृश घटनेने खळबळ

बाजारपेठेतील सोनार दांपत्याला दुकानात मारहान

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील मुख्य बाजारपेठेतील एका सोनाराच्या दुकानात दाम्पत्य दुकान बंद असताना रात्री आठच्या सुमारास अचानक एका युवकाने दुकानात घुसून दांपत्याला हत्यार सारख्या वास्तूने मारहाण केल्याने खळबळ उडाली असून दरोडा सदृश घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील महेंद्र शहा यांच्या सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास महेंद्र जयंतीलाल शहा व सरिताबेन महेंद्र शहा हे दोघेजण दुकान बंद करत असताना अचानक एक युवक दुकानामध्ये आला त्याने शहा दांपत्याला कोणत्यातरी हत्यार सदृश्य वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केल्याने दोघांनी आरडाओरडा केला.

याचवेळी शेजारी नागरिकांचा आरडाओरडा सुरु झाल्याने युवक दुकानातील मागील दरवाज्याने पळून गेला मात्र या घटनेमध्ये सरिताबेन शहा या किरकोळ जखमी झाल्या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन आतकर, पोलीस हवलदार किशोर तेलंग, संदीप कारंडे, आत्माराम तळोले, भरत कोळी, पोलीस नाईक जयदीप देवकर, संतोष शिंदे, विकास पाटील, अंबादास थोरे, रोहिदास पारखे यांसह आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी अचानक घडलेल्या प्रकाराने आणि पोलिसांचा ताफा बाजारपेठेत हजर झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता घडलेला सर्व प्रकारचे सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे, तर याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र सर्व तपासा नंतर याबाबतचा प्रकार समोर येईल असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

बाजाराच्या दिवशी घडलेल्या घटनेने खळबळ…

तळेगाव ढमढेरे येथे सोमवारी आठवडे बाजार असतो आणि ऐन बाजाराच्या दिवशीच बाजारपेठेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

12 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago