शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर लोकसभा मतदारसंघातील काही गद्दार पक्ष सोडून गेले असतील. परंतु तरीही आज या प्रवेशामुळे ती पोकळी भरून निघाली आहे. माजी खासदार पक्ष सोडून गेल्याने कुठेही खिंडार पडले नसून उलट निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा एकदा जोमाने कामाला लागल्याचे मत शिरूर लोकसभा युवासेना विस्तारक नीलेश बडदे यांनी व्यक्त केले.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील युवासेनेत पक्षाचे माजी शहरप्रमुख सुनील जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख अॅड शरद बांदल, युवासेना शिरुर शहर अधिकारी स्वप्निल रेड्डी, युवानेते अविनाश घोगरे, युवासेना तालुकाधिकारी विजय लोखंडे यांच्या प्रयत्नांतून शहरातील विविध भागांतून ९० जणांनी ( ठाकरे गटातील ) युवासेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांना पदांचे वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी बडदे बोलत होते. शिवसेना फुटीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश झाल्याने शहरात पक्षाची ताकद वाढली आहे.
या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख संदीप शिंदे, शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष गणेश जामदार, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष योगेश ओव्हाळ, अनिल पवार, ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल गाडे, राजेंद्र परदेशी आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जाधव यांनी तर स्वागत गणेश जामदार यांनी केले. तसेच सूत्रसंचालन अविनाश घोगरे यांनी तर मंगेश खांडरे यांनी आभार मानले.
शिरुर तालुक्यात कोणीही गटातटाचे राजकारण न करता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. कुठेही, कधीही अडचण आल्यास युवासेनेचा पदाधिकारी म्हणून मी सदैव पाठीशी आहे. मी एक वकील असून, कायदेशीर अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी आपण कधीही माझ्याशी संपर्क करावा.
अॅड शरद बांदल
(युवासेना, उपजिल्हाप्रमुख)
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…