शिरूर तालुका

अक्षय नाणेकर यांचा झंझावाती प्रचार; उत्स्फूर्त प्रतिसाद

पाबळ (सुनिल जिते): कारेगाव -कान्हूर मेसाई पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अक्षय नाणेकर सध्या संपूर्ण मतदारसंघात झंझावाती प्रचार करीत असून, त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच वेग घेत आहे. गावोगाव, वाडी-वस्तीवर जाऊन थेट मतदारांशी संवाद साधत असल्याने त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत होत असून, कान्हूर -कारेगाव गणात त्यांच्या विजयाची चर्चा जोर धरू लागली आहे.  प्रचारादरम्यान त्या स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घराघरांत, शेतात, बांधावर जाऊन घेत आहेत.

पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिलांचे प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगार, या मुद्द्द्यांवर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत निवडून आल्यानंतर प्राधान्याने काम करण्याचा विश्वास दिला.अक्षय नाणेकर सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत आहे. महिलांचा, युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग या प्रचार दौऱ्यात दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धोरणांचा व आजवर केलेल्या समाजकार्याचा आढावा घेत भविष्यात कारेगाव -कान्हूर मेसाई गणाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गावागावांचा समतोल विकास साधत शेतकरी, महिला व युवकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार आहे.

अक्षय नाणेकर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

3 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

3 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

3 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

3 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

3 तास ago