शिरूर तालुका

शिरूर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात संतप्त निषेध आंदोलन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिरूर तहसील कार्यालयासमोर आ. गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी आ. पडळकर यांनी केलेल्या वाचाळ वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहिर, ज्येष्ठ नेते रविंद्रजी मिर्लेकर व जिल्हाप्रमुख अशोकरावजी खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे तीव्र आंदोलन पार पडलं. आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आ. पडळकर यांच्या निषेधाचा झणझणीत आवाज शिरूर शहरात घुमवला.

आंदोलनात उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील, तालुका सल्लागार संतोष काळे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशालबापू गाडे, महिला आघाडीच्या संगिताताई शिंदे, ग्राहक संरक्षणचे कैलास पवार, मा. चेअरमन तात्या धावडे, मा. सरपंच बंडूसेठ पवार, व्हा. चेअरमन साहेबराव कारंडे, तसेच अजित पवार, दौलत पवार, प्रताप चव्हाण, सुनिल चव्हाण, संतोष चौधरी, संदीप पवार, ग्राहक संरक्षणचे सुनिल खळदकर यांच्यासह शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

या वेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शिवसेनेच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेला जो दुखावेल, त्याला महाराष्ट्रात कोठेही जागा नाही. पडळकर यांनी केलेली तुलना शिवरायांचा आणि तमाम मराठी जनतेचा अपमान आहे. अशा नालायक विधानांचा निषेध करणे हीच खरी शिवसेनेकरी जबाबदारी आहे. यावेळी शिस्तबद्ध आणि ठाम पद्धतीने झालेले आंदोलन हे इतर राजकीय पक्षांसाठीही एक संदेश देणारे ठरले. आंदोलनात सहभागी शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर आक्रोश नव्हे तर स्वाभिमान होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

2 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

17 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

23 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

23 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

24 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

24 तास ago